ठाणे जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांची भरती

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे मध्ये वैद्यकीय अधिकारी (Medical Officer )च्या एकूण रिक्त 04 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 6 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer )

नौकरी स्थान: ठाणे
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 06 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 04 जागा
वयोमर्यादा: 30 नोव्हेंबर 2016 रोजी 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी: Rs. 15,600 – 39,100/- ग्रेड पे  5,400/-

शैक्षणिक पात्रता :

MBBS

 

निवडणुकीची प्रकिया:

30 नोव्हेंबर 2016 या दिनांकापूर्वी अथवा दिनांकास आंतरवासिता पूर्ण असणारे उमेदवारच पात्र ठरतील.

आवेदन प्रकिया: 

महाराष्ट्र वैधकीय व आरोग्य सेवा गट-अ या संवर्गातील वैधकीय अधिकारी या पदावर सरळ सेवेने पदभरती करण्यासाठी www.collectorpalghar.in या संकेतस्थळामार्फत अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.  उमेदवाराने खाली नमूद केलेल्या शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड डराफ्ट -जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे यांच्या नावे काढून अर्जासोबत जोडावा आणि संपूर्ण भरलेला अर्ज नमूद केलेल्या आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रति व प्रतिज्ञापत्र त्यासोबत जोडावे. मूळ प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण भरलेला अर्ज तळमजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे या कार्यालयात दिनांक 6 डिसेंबर 2016 रोजी सायंकाळी 5.30   पर्यंत सादर करणे आवश्यक.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 29 नोव्हेंबर  2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 6 डिसेंबर 2016

READ  एन बी सी सी इंडिया लिमिटेड (NBCC India Limited) मध्ये विविध पदांच्या भरती

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

ठाणे जिल्ह्यात पोलीस पाटील पदांची भरती

एकूण जागा : 201 जागा

पदाचे नाम:

पोलीस पाटील [Police Patil]

 • उपविभागीय कार्यालय ठाणे – 28 जागा
 • उपविभागीय कार्यालय उल्हासनगर- 55 जागा
 • उपविभागीय कार्यालय कल्याण – 118 जागा

शुल्क : Rs 400 /- [मागासवर्गीय – Rs 200 /- ]

नौकरी स्थान:  ठाणे

आवेदन स्वीकारणायची अंतिम तारीख : 

 • ठाणे- 27 ऑक्टोबर 2016
 • उल्हासनगर – 28 ऑक्टोबर 2016
 • कल्याण – 26 ऑक्टोबर 2016

रिक्त पदांची संख्या :

♦ पोलीस पाटील [Police Patil]

 • उपविभागीय कार्यालय ठाणे – 28 जागा
 • उपविभागीय कार्यालय उल्हासनगर- 55 जागा
 • उपविभागीय कार्यालय कल्याण – 118 जागा
READ  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी पदभरती ( Vasantrao Naik Marathwada Agricultural University Recruitment )

कार्यालयाचा  पत्ता :

जिल्हाधिकारी कार्यालय
कोर्ट नाका
ठाणे (पश्चिम )

शैक्षणिक अहर्ता  :

i) 10 वी उत्तीर्ण ii)  शारीरिकदृष्ट्या सक्षम, निष्कलंक चारित्र्याचा उमेदवार

वयाची  मर्यादा :

25 ते 45 वर्षे    [मागासवर्गीय- 05 वर्षे सूट ]

अर्ज करण्याची पध्दत :

परीक्षेसाठी करावयाचा अर्ज 30 रुपये भरुन संबंधित तहसीलदार कार्यालयात मिळेल. हा अर्ज हस्तांतरणीय नाही. भरलेला अर्ज पोस्टाने पाठवायचा नाही. असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सोबत जोडायच्या कागदपत्रांची माहिती अर्जासोबत दिली आहे.

महत्वाचा तारखा

परीक्षा: 20 नोव्हेंबर 2016

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख :

 • ठाणे- 27 ऑक्टोबर 2016
 • उल्हासनगर – 28 ऑक्टोबर 2016
 • कल्याण – 26 ऑक्टोबर 2016

वरील पदाविषयी विस्तृत माहितीसाठी इथे क्लीक करा

ठाणे जिल्हा विषयी माहिती

ठाण्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. भारत देशात पहिली आगगाडी (रेल्वे) ही दि. 16 एप्रिल 1853 साली मुंबई ते ठाणे येथे सुरु झाली. सागरी, डोंगरी व नागरी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभली आहे. ठाणे जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्यादेखील मोठ्या प्रमाणावर आहे. 6 महानगरपालिका, 2 नगरपालिका, सिडको, एमआयडीसी आदी नियोजन प्राधिकरणे असलेला ठाणे हा राज्यातला एकमेव जिल्हा आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. ठाणे जिल्हयात 18 आमदार आणि 3 खासदार एवढे लोकप्रतिनिधी आहेत. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्हयाची ओळख आहे. शहापूर तालुका हा तर धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. केंद्र शासन अंगीकृत दारु गोळा व शस्त्र निर्मिती करणारा कारखाना अंबरनाथ या तालुक्यात आहे. ठाणे जिल्हयातील भिवंडी हे शहर हातमाग यंत्रावर कपडे विणण्यासाठी प्रसिध्द आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे जिल्हयात 10 औद्योगिक वसाहती विकसित केल्या आहेत. तीन राष्ट्रीय महामार्ग व तीन लोहमार्ग ठाणे जिल्हयातून जातात. तलावांचे शहर अशी ठाणे शहराची ओळख आहे. हाजीमलंगगड, गोरखगड, माहुली इ. ऐतिहासिक किल्ले ठाणे जिल्ह्यात आहेत.

READ  जिल्हा परिषद परभणी मध्ये विविध पदभरती

जिल्हाधिकारी कार्यालय
कोर्ट नाका
ठाणे (पश्चिम )

Phone : 91 – 22 – 25343636
Fax : +91 – 22 – 25349200
Email : collector.th[email protected]
Website : http://www.thane.nic.in/

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत